मॉस्को, किव्ह – रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांनी संरक्षणमंत्र्यांना युक्रेनवरील आक्रमण सुरूच ठेवण्याचे आदेश दिले आहेत. रशियाने लिन्सचान्स्क शहरावर ताबा मिळवल्यानंतर पुतीन यांनी हा आदेश दिला आहे. आधी ठरलेल्या योजनेनुसार उद्दिष्टांचा पाठपुरावा करण्याचे आवाहन पुतीन रशियन फौजांना केले आहे.
आता पूर्ण लुहान्स्क शहर रशियाच्या ताब्यात आला आहे. आता पूर्ण प्रदेशच रशियाच्या ताब्यात गेल्याने दूरवरून ते उद्ध्वस्त केले जाणार नाही, असे या प्रदेशाचे युक्रेनियन गव्हर्नर म्हणाले.
युक्रेनला आणखी लष्करी सामग्री पुरवणार असल्याचे आश्वासन ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानिझ यांनी दिले आहे. ते सध्या युक्रेनच्या दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान अल्बानिझ आणि युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांची किव्हमध्ये भेट झाली. अल्बानिझ यांचा युक्रेन दौरा अचानक ठरला होता. यापूर्वी त्यांनी बुचा आणि इर्पिनचा दौरा केला होता. त्यामुळे तिथे संघर्षामुळे झालेल्या स्थितीचंही वर्णन केले.
ऑस्ट्रेलियाने 100 दशलक्ष ऑस्ट्रेलियन डॉलर युक्रेनला मदत दिली आहे. त्यात ड्रोन आणि 34 लष्करी वाहनांचा समावेश आहे. त्याचसोबत, ऑस्ट्रेलियाने रशियाच्या आणखी 16 मंत्र्यांवर ऑस्ट्रेलियात प्रवासासाठी बंदी घातली आहे.