Vladimir Putin- रशियाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत पुतीन यांचा विजय निश्चित आहे. गेल्या पाव शतकापासून अध्यक्ष असलेल्या पुतीन यांना आता आणखीन ६ वर्षांची मुदवाढ मिळणार आहे. काल संपलेल्या मतदानानंतर कोणत्याही अन्य उमेदवाराला जनादेश मिळालेला नाही.
तीन दिवसांच्या निवडणूक प्रक्रीयेला शुक्रवारपासून प्रारंभ झाला. या निवडणुकीदरम्यान कोणत्ही विरोधकांना युक्रेन युद्धावर टीका करण्याची अनुमती देण्यात आली नव्हती. पुतीन यांचे कट्टर विरोधक नवाननी यांचा तुरुंगात मृत्यू झाला.
तर अन्य विरोधक तुरुंगातच आहेत. त्यामुळे पुतीन यांना विरोधकच उरलेले नाहीत. पण तरिही नागरिक आपल्या मनातील असंतोष व्यक्त करत आहेत.
मतपेट्यांमध्ये हिरवा रंग ओतण्याच्या काही घटना घडल्या आहेत. याच आरोपाखाली एका प्राध्यापकाला १५ दिवसांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली गेली. तर अशाच प्रकारे मतपेटीमध्ये रंग टाकणार् या एका महिलेला सैन्याचा अपमान केल्याच्या आरोपाखाली ३० हजार रुबल (३४२ डॉलर) चा दंड केला गेला.
या निवडणुकीसाठी कोणाही विदेशी निरीक्षकांना अनुमती देण्यात आलेली नव्हती. केवळ सरकारी निरीक्षकांच्या देखरेखीखाली हे मतदान पार पडले. मात्र त्या मतदानाच्या विश्वासार्हतेबद्दल साशंकता व्यक्त होते आहे.
युक्रेनचे नव्याने हल्ले सुरू …
ही निवडणूक प्रक्रीया सुरू असतानाच युक्रेनने रशियावर नव्याने रॉकेट हल्ले सुरू केले आहेत. युक्रेनने रात्रभरात डागलेली ३५ ड्रोन पाडण्यात आली. यातील ४ ड्रोन राजधानी मॉस्कोजवळ होती, असे रशियाच्या संरक्षण मंत्र्यांत्रालयाने म्हटले आहे. या ड्रोन हल्ल्यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.