जयपुर – राजस्थानातील भारतीय जनता पक्षाच्या माजी आमदार अमृता मेघवाल यांच्या गाडीवर आज दगडफेक करण्यात आली. त्यात त्या किरकोळ जखमी झाल्या आहेत. त्यांच्या कानाला त्यातून ईजा झाली आहे.
दरम्यान पोलिसांनी सांगितले की अमृता मेघवाल यांची काही जणांशी बॉयलॉजिकल पार्क परिसरात भांडणे झाली होती. याच लोकांनी मेघवाल यांच्या गाडीचा पाठलाग करून त्यांच्या गाडीवर दगडफेक केली. या प्रकरणात अजून गुन्हा नोंदवून घेण्यात आला असून अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. पोलीस हल्लेखोरांचा शोध घेत आहेत. तथापि यातील भांडणाचे नेमके कारण काय होते ते मात्र अजून समजू शकलेले नाही.