Assembly Elections 2023 : देशात 2024 मध्ये लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांपूर्वी पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका (Assembly Elections ) पार पडणार आहेत. त्याच निवडणुकांचा आज बिहूल वाजला आहे. पाच राज्यांच्या निवडणुकांच्या तारखा आज निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यानुसार मध्यप्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, मिझोरम आणि तेलंगणा (Assembly Election 2023 Dates) या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम आज जाहीर झाला.
केंद्रीय निवडणूक आयोगाने आज दिल्लीत पत्रकार परिषद घेत निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. मध्यप्रदेशमध्ये 17 नोव्हेंबर, छत्तीसगडमध्ये 7 आणि 17, नोव्हेंबर, राजस्थानमध्ये 23 नोव्हेंबर, मिझोरममध्ये 7 नोव्हेंबर आणि तेलंगणामध्ये 30 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. पाचही राज्यांची मतमोजणी 3 डिसेंबरला रोजी होणार आहे.
EC declares election dates in five states; polling in Rajasthan on Nov 23, Madhya Pradesh on Nov 17 and Telangana on Nov 30
Read @ANI Story | https://t.co/HRTkLcNv9R#EC #election #Rajasthan #MadhyaPradesh pic.twitter.com/xFM8Qza63R
— ANI Digital (@ani_digital) October 9, 2023
पाच राज्यात सोळा कोटींपेक्षा जास्त मतदार आहे. पाच राज्यात 679 जागांवर मतदान होणार आहे. 60 लाख युवा मतदार पहिल्यांदा मतदान करणार आहे. मतदानासाठी नोंदणी करणाऱ्यांमध्ये महिलांची संख्या जास्त आहे. आदिवासी भागात PVTG मतदान केंद्राची सोय करण्यात आली आहे. ज्येष्ठ नागरिकांना व्होट फ्रॉम होम करता येणार आहे.
लवकरच या पाच राज्यात आचारसंहिता लागू करण्यात येणार आहे. मिझोरममध्ये साडे आठ लाख, छत्तीगडमध्ये 2.03 कोटी, मध्य प्रदेशमध्ये 5.6 कोटी, राजस्थानमध्ये 5.25 कोटी आणि और तेलंगणामध्ये 3.17 कोटी मतदार मतदान करणार आहेत.
कोणत्या राज्यात कधी मतदान? (Five state voting & counting dates)
* मिझोरम – 7 नोव्हेंबर रोजी मतदान (Mizoram voting date)
* छत्तीसगड – 7 आणि 17 नोव्हेंबर रोजी मतदान (Chhattisgarh voting date)
* मध्यप्रदेश – 17 नोव्हेंबर रोजी मतदान (Madhya Pradesh voting date)
* राजस्थान – 23 नोव्हेंबर रोजी मतदान (Rajasthan voting date)
* तेलंगाणा – 30 नोव्हेंबर रोजी मतदान
* पाच राज्यांचा निकाल – 3 डिसेंबर रोजी
पाच राज्यांमध्ये 8.2 कोटी पुरुष मतदार आहेत. 17 ऑक्टोबरला मतदान यादी प्रसिद्ध होणार असून, 23 ऑक्टोबरपर्यंत मतदान यादी सुधारण्याची संधी मतदारांना असणार आहे. 17,734 मॉडेल मतदान केंद्रे आणि 621 मतदान केंद्रांच्या व्यवस्थापनाची जबाबदारी पीडब्ल्यूडी कर्मचाऱ्यांकडे असणार आहे. महिला 8,192 मतदान केंद्रांची जबाबदारी सांभाळणार आहेत.