मुंबई – अभिनेत्री रूपाली भोसले (Rupali Bhosle)’ आई कुठे काय करते?’ या मालिकेत ‘संजना’ नावाची भूमिका साकारत आहे. यातील तिच्या भूमिकेला भरभरून प्रेम मिळत आहे. तिच्या उत्तम अभिनयाचे अनेकदा कौतुक केले जाते. याशिवाय रुपाली सोशल मीडियावर देखील सक्रिय असते. नुकतेच तिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.
रुपालीने इनस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत लिहिले की, ‘तुम्ही तुमचे भविष्य ठरवू शकत नाही. तुम्ही तुमची आवड ठरवू शकता आणि तुमची आवड तुमचं भविष्य ठरवते.’ यासोबत तिने काळ्या रंगाच्या घोड्याबरोबरचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमधील रूपालीचा लुक फारच सुंदर दिसत आहे. रुपालीची ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे. रुपालीच्या या पोस्टवर चाहते मोठ्या प्रमाणात कमेंट करत आहेत.
View this post on Instagram
दरम्यान काही दिवसांपूर्वीच तिने चित्रपटांमध्ये काम न करण्यामागचे कारण सांगितले होते. “माझ्या वाटेला सिनेमे आलेच नाहीत, आले ते पण खूप मोजके आले, मला खरंच आवडलं असतं सिनेमा करायला आणि मला अजूनही सिनेमे करायची खूप इच्छा आहे, जे मोजके सिनेमे मी केले त्यातला हा “विनाकारण राजकारण” हा प्रेक्षकांपर्यंत पोहोचला, आणि त्या चित्रपटाच्या भूमिकेसाठी मला हे Award ही मिळालं. माझ्यासाठी हा आनंद खूप मोठा आहे, कारण हे सिनेमाचं Award आहे,” असे तिने पोस्ट शेअर करत लिहिले होते.
रूपालीला “विनाकारण राजकारण” या सिनेमासाठी पुरस्कार मिळाल्यानंतर तिने चित्रपटाच्या संपूर्ण टीमचे आभारही मानलेही होते.