नवी दिल्ली : जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठाजवळ सुधारीत नागरिकत्व कायद्याविरोधात (का) सुरू असणाऱ्या निदर्शनातील निदर्शकांवर हल्ला करणाऱ्या युवकाची ओळख पटली असून त्याचे नाव रामभक्त गोपाल शर्मा असे आहे.
त्याचे फेसबुकवर नाव रामभक्त गोपाल असे आहे. तो काळे बॉम्बर जाकीट घालून निदर्शनाकडे जात असल्याचा व्हिडिओ त्याने व्हायरल केला आहे. यात तो ये लो आझादी असे ओरडत आहे. त्यात शाबाद फारूक हा जखमी झाला.
त्याने फेसबुक पोस्टवर आपल्या कृतीसाठी परिणामांना सामोरे जाण्यास तयार असल्याचे लिहले आहे. तो म्हणतो. माझ्या अंतीम प्रवासात मला भगव्या वस्त्रात गुंडाळून न्या आणि घोषणा द्या जय श्रीराम अशी पोस्ट त्याने केली आहे.
आणखी एका पोस्टमध्ये शाहीन बाग गेम ओव्हर असे त्याने लिहले आहे. तेथे हिंदु माध्यमांची उपस्थिती नाही, असेही त्याने लिहले आहे. अन्य एका पोस्टमध्ये त्याचा मित्र चंदन गुप्ता याच्या कासगंज हिंसाचारात 26 जानेवारी 2018 रोजी मृत्यू झाला होता. त्याचा बदला म्हणून हे कृत्य केल्याचे त्याने म्हटले आहे.