पुणे : विक्रेत्याने मास्कचे पैसे मागितले म्हणून त्याच्या डोक्यात दगड घालून त्याला जखमी करण्यात आले. ही घटना नगर रोडवरील एका पेट्रोलपंपाजवळ घडली. याप्रकरणी विमानतळ पोलिसांनी शशीकांत दिपक अडागळे(19) आणी महादेव सुभाष साठे(19,दोघेही रा.विमानतळ) यांना अटक केली आहे.
फिर्यादी सालम शेख (34,रा.येरवडा) हे रस्त्याच्याकडेला स्टॉलमध्ये मास्क विक्री करत होते. यावेळी दोघे आरोपी दुचाकीवरुन तेथे आले. त्यांनी मास्क पसंत केल्यावर पैसे न देता ते निघुन जाऊ लागले. फिर्यादीने त्यांना पैशाची मागणी केली असता, ते म्हणाले कशाचे पैसे मी तुला पुन्हा येऊन भेटुन जाणार असे म्हणाले.
यानंतर फिर्यादी रात्री स्टॉल बंद करुन जात असताना , तेथे दुचाकीवरुन दोघेही आरोपी दाखल आले. त्यांनी मास्कचे पैसे मागितल्याचा राग मनात धरत फिर्यादीच्या डोक्यात दगडाने मारुन त्यांना जखमी केले. फिर्यादीने रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर तक्रार दाखल केली.