Asian Games Day 10 Highlights : आशियाई क्रीडा 2023 स्पर्धेत 10 व्या दिवशी भारताला नऊ पदके मिळाली. भारताला पहिल्या दिवशी पाच, दुसऱ्या दिवशी सहा, तिसऱ्या दिवशी तीन, चौथ्या दिवशी आठ, पाचव्या दिवशी तीन, सहाव्या दिवशी आठ, सातव्या दिवशी पाच, आठव्या दिवशी 15 आणि नवव्या दिवशी सात पदके मिळाली. दहाव्या दिवशी अॅथलेटिक्समध्ये पदकांचा पाऊस पडला. मात्र, भारताला आज 70 चा जादुई आकडा स्पर्श करता आला नाही.
भारताकडे पदकांची संख्या…
सुवर्णपदक: 15
रौप्यपदक: 26
कांस्य पदक: 28
एकूण पदके: 69
Our current Medal Tally. Let’s #Cheer4india 🇮🇳 #WeAreTeamIndia | #IndiaAtAG22 pic.twitter.com/Ignwwft0Od
— Team India (@WeAreTeamIndia) October 3, 2023
भारतासाठी दहावा दिवस चांगला ठरला. मंगळवारी भारताने नऊ पदके जिंकली. यामध्ये दोन सुवर्ण, दोन रौप्य आणि पाच कांस्य पदकांचा समावेश आहे. पारुल चौधरीने महिलांच्या 5000 मीटर शर्यतीत सुवर्ण आणि अन्नू राणीने महिलांच्या भालाफेक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले. तर, मोहम्मद अफझलने पुरुषांच्या 800 मीटर शर्यतीत रौप्यपदक तर तेजस्वीन शंकरने पुरुषांच्या डेकॅथलॉनमध्ये रौप्यपदक जिंकले.
प्रवीण चित्रवेलने पुरुषांच्या तिहेरी उडीत कांस्यपदक, विद्या रामराजने महिलांच्या 400 मीटर हर्डल्स स्पर्धेत कांस्यपदक, प्रितीने महिलांच्या 54 किलो बॉक्सिंग स्पर्धेत कांस्यपदक आणि नरिंदरने पुरुषांच्या 92 किलो वजनी बॉक्सिंग स्पर्धेत कांस्यपदक जिंकले. याशिवाय अर्जुन सिंग आणि सुनील सिंग यांनी पुरुषांच्या कॅनो दुहेरी 1000 फायनलमध्ये कांस्यपदक जिंकले.