नवी दिल्ली – भारतीय पुरुष क्रिकेट संघाने आशियाई क्रीडा 2023 (Asian Games 2023) स्पर्धेमध्ये सुवर्णपदक (Gold Medal) जिंकले आहे. एशियन गेम्स 2023 (Asian Games) मध्ये भारत आणि अफगाणिस्तान (Ind vs afg) यांच्यातील सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. याचाच फायदा भारताला झाला.
अफगाणिस्तानपेक्षा भारताची रँकिंग जास्त असल्याने भारताला विजेता घोषित करण्यात आले. अफगाणिस्तान संघाला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. तत्पूर्वी, दिवसाच्या पहिल्या सामन्यात बांगलादेशने पाकिस्तानचा 6 गडी राखून पराभव करत कांस्यपदक जिंकले होते. (Indian men’s cricket team wins gold)
भारतीय कर्णधार ऋतुराज गायकवाडने (Ruturaj Gaikwad) नाणेफेक जिंकून बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला होता. अफगाणिस्तानने १८.२ षटकात ५ गडी गमावून ११२ धावा केलेल्या असताना वरुणराजाचे आगमन झाले आणि खेळ थांबवावा लागला.त्यानंतर सामना पुन्हा सुरु न होऊ शकल्याने आयसीसी टी-२० क्रमवारीच्या आधारे भारताला विजेता घोषित करण्यात आले.
भारताच्या क्रिकेट संघाने आपल्या पहिल्याच प्रयत्नात आशियायी गेम्समध्ये पहिल्यांदाच गोल्ड पटकावले.पाऊस आल्याने रँकिंगच्या आधारे विजेत्याची निवड करण्यात आली यामध्ये भारताने बाजी मारली.