Asia Cup 2023 Bangladesh vs Sri Lanka : आशिया चषक स्पर्धेत आज (31 ऑगस्ट) ‘ब’ गटातील बांगलादेश विरूध्द श्रीलंका या दोन्ही संघांमधला सामना कँडीच्या पल्लेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जात आहे.
सामन्यात नाणेफेक जिंकल्यानंतर बांगलादेशी संघ प्रथम फलंदाजीला उतरला आणि 42.4 षटकात 164 धावांवर आटोपला. त्यामुळे श्रीलंकेला 165 धावांचे माफक आव्हान मिळालं आहे.
बांगलादेशाकडून फलंदाजीत नजमुल हुसेन शांतोने अर्ध्याहून अधिक धावा केल्या. नजमुलने 122 चेंडूत 89 धावांची खेळी खेळली. त्याचे शतक अवघ्या 11 धावांनी हुकले. नजमुलशिवाय एकही फलंदाज क्रीझवर टिकू शकला नाही.
तौहीद हृदयाने 20, मोहम्मद नईमने 16 आणि मुशफिकर रहीमने 13 धावा केल्या. या चौघांशिवाय इतर कोणत्याही फलंदाजाला दुहेरी आकडा गाठता आला नाही.
श्रीलंकेकडून वेगवान गोलंदाज मथिशा पाथिरानाने चार बळी घेतले. महिष तिक्षाने दोन गडी बाद केले. धनंज डी सिल्वा, दुनिथ वेलालगे आणि दासुन शानाका यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.