पुणे: गुरू तेगबहादूर फुटबॉल स्पर्धेत अशोका, ब्ल्यूस्टॅग, व्हॅली हंटर्स आणि स्ट्रायकर्स संघांनी आपापल्या सामन्यात विजय मिळवित आगेकूच केली.
अशोकाने युकेएमचा 2-0 असा पराभव केला. त्यात करण गोरखाने 20 व्या आणि प्रसाद भंडारीने 26 व्या मिनिटाला गोल केले. ब्ल्यूस्टॅगने स्वराज संघाचा 2-1 असा पराभव केला.
त्यात पार्थ मिश्राने 50 व्या तर प्रविण जालापोरने 55 व्या मीनिटाला गोल केले. स्वराज संघाकडून प्रथमेश मोरेने 58 व्या मीनिटाला गोल केला.
व्हॅली हंटर्सने व्होबावर 3-2 अशी मात केली. स्ट्रायकर्सने थंडर कॅट्सचा 4-2 असा
पराभव केला.