पुणे रेल्वे स्थानकांतून प्रवाशांच्या सोयीसाठी उपायोजना
पुणे –पुणे रेल्वे स्थानक येथे प्रवाशांच्या सोयीसाठी पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून प्रायोगिक तत्त्वावर सेवा देण्यात येत आहे. या सेवेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. प्रवाशांना येथून 5 मिनिटांत बस उपलब्ध होत असल्याने प्रवासी बसेसला पसंती देत आहेत. परिणामी, स्टेशन आवारातील रिक्षांची संख्या घटली आहे.
पुणे स्टेशन येथून रोज लाखो प्रवासी ये-जा करतात. स्टेशनवर उतरल्यानंतर प्रवाशांना शहरातील इतर भागांत जाण्यासाठी यापूर्वी बसची सोय नव्हती. परिणामी प्रवाशांना रिक्षा, ओला, उबेर आदी वाहनांमधून प्रवास करावा लागत होता. परिणामी रिक्षाचालकांकडून अनेकदा मीटरप्रमाणे भाडे न आकारणे, जादा पैसे उकळण्याचे प्रकार समोर येत होते.
मात्र, नुकतेच पीएमपी प्रशासनाने थेट स्टेशन आवारातून बससेवा सुरू केली. येथून प्रवाशांना दर 5 मिनिटांना बसेस उपलब्ध होत आहेत. यामुळे प्रवासी पीएमपी बससेवा पसंती देत आहेत. दरम्यान, 5 मिनिटांना बस उपलब्ध असल्याने रिक्षाचालकांची पंचाईत झाली आहे. प्रवाशांच्या कमी संख्येमुळे गुरुवारी आवारातील रिक्षांच्या संख्येत घट झाल्याचे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. प्रवाशांना बसची माहिती मिळण्यासाठी प्रशासनाने माहिती कक्ष सुरू केला आहे. यामुळे प्रवाशांना याचा फायदा होत आहे.
पीएमपी प्रशासनाने बससेवा सुरू केल्याने प्रवाशांना फायदा होत आहे. सद्यस्थितीत रात्रीच्या साडेदहापर्यंत स्टेशन आवारातून बस उपलब्ध होत आहे. मात्र, स्टेशनवर मध्यरात्री येणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. यामुळे पीएमपी प्रशासनाने रात्रीदेखील येथील बससेवा सुरू ठेवावी, यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे.
– मिलींद देऊस्कर, विभागीय रेल्वे प्रबंधक