Vasant More VBA Loksabha 2024 : वंचित बहुजन आघाडीने पुण्यातून वसंत मोरे यांना (Vasant More) उमेदवारी जाहीर केली. त्यानंतर पुण्यात तिरंगी लढत होणार हे निश्चित झालं. पुण्यातून भाजपकडून मुरलीधर मोहोळ आणि काँग्रेसकडून रवींद्र धंगेकर यांना लोकसभेच्या मैदानात उतरवलं आहे.यानंतर आता वसंत मोरेंनी प्रचाराचा नारळ फोडला आहे. यावेळी बोलताना आंबेडकरांची दोन मत ही दोन लाखाप्रमाणे आहेत असा विश्वास व्यक्त करत मोरे यांनी उमेदवारी आधी प्रकाश आणि सुजात आंबेडकर यांच्या भेटीचा किस्सा सांगितला.
माझी लढाई कोणत्याही व्यक्तीसोबत किंवा नगरसेवकासोबत नाही तर माझी लढाई ही संविधानाविरोधात असलेल्यांसोबत आहे असं देखील वसंत मोरे डिजिटल प्रभातशी बोलताना म्हणाले. तसेच उमेदवारी दिल्याबद्दल वसंत मोरे यांनी प्रकाश आंबेडकर यांचे आभार मानले. | Vasant More VBA Loksabha 2024
पुण्यातील महत्वाच्या प्रश्नांवर प्रकाश आंबेडकर यांच्याशी बोलल्यानंतर दोन दिवसांनी माझी उमेदवारी जाहीर करण्यात आल्याचे मोरे यांनी सांगितले.सुजात आंबेडकर यांना जेव्हा भेटलो तेव्हा ते स्वतः म्हणाले,मी पुणेकर आहे आणि मी खरच नशीबवान आहे मला तुमच्यासारख्या उमेदवाराला मतदान करण्याची संधी मिळाली, माझी दोन मत आहेत आणि ती तुमच्यासोबत असतील असं सुजात यांनी म्हंटल याबाबत सांगताना आंबेडकरांची दोन मतं म्हणजे दोन लाख मतं आहेत असा विश्वास मोरेंनी व्यक्त केला. | Vasant More VBA Loksabha 2024
मनसेमध्ये असताना वसंत मोरे यांनी केलेली अनेक आंदोलने चर्चेत राहिलेली आहेत. सोशल मीडियाचा प्रभावीपणे वापर करून मोरे हे आपल्या मतदारांपर्यंत अगदी सहजतेने पोहचण्यासाठी ओळखले जातात. अशात भाजप विरुद्ध काँग्रेसच्या लढतीत वंचितने मोरे यांना तिकीट दिल्याने पुणे लोकसभेची निवडणूक चांगलीच रंगतदार होणार आहे. | Vasant More VBA Loksabha 2024
“शरद पवारांनी आमचे स्वप्न पूर्ण केले..” देवेंद्र फडणवीस नेमकं असं का म्हणाले ? वाचा सविस्तर..