मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. शरद पवारांनी निवृत्तीची घोषणा केल्यापासून राष्ट्रवादीचे कार्यकर्ते पवारांनी राजीनामा मागे घ्यावा यासाठी आंदोलन करत आहेत. तसेच नव्या अध्यक्ष निवडीसाठी पवारांनी घोषित केलेल्या समितीने एकमताने त्यांचा राजीनामा मंजूर करावा अशी मागणी कार्यकर्ते राष्ट्रवादीच्या इतर नेत्यांकडे करत आहेत. याच विषयावर आज प्रदेश कार्यालयात बैठक सुरु आहे. या बैठकीसाठी अजित पवार कार्यालयात येताच आंदोलक कार्यकर्त्यांनी ‘देश का नेता कैसा हो, शरद पवार जैसा हो’ अशा घोषणा दिलेल्या पाहायला मिळाल्या.
#WATCH | NCP leader Ajit Pawar arrives at the party office in Mumbai pic.twitter.com/VewxhSVFUH
— ANI (@ANI) May 5, 2023
या ठिकाणी उपस्थित असलेले मुंबई राष्ट्रवादीचे कार्यध्यक्ष नरेंद्र राणे एका वृत्तवाहिनीला बोलताना आपले मत व्यक्त केले. यावेळी त्यांनी , “आमचे सर्व नेते आणि कार्यकर्ते यांचं एकच म्हणणं आहे की, शरद पवार यांनीच अध्यक्ष रहावं. यात अजित पवार, प्रफुल्ल पटेल आणि जयंत पाटील अशा सर्वांचाच समावेश आहे. शरद पवारांनीही काल स्पष्ट केलं की, समितीच्या आजच्या बैठकीत जो निर्णय होईल त्यावर ते चर्चा करतील.”
“कार्याध्यक्ष म्हणून सुप्रिया सुळे मान्य आहेत का?” या प्रश्नावरही त्यांनी भाष्य केलं. “आमचं म्हणणं आहे की, कार्याध्यक्ष द्या, मात्र पुढील ३ वर्षे शरद पवार राज्यसभेचे खासदार आहेत. ते तीन वर्षे शरद पवार यांनीच रहावं.
हे तीन वर्षे कुणालाही कार्याध्यक्षपद द्यावं. जेणेकरून त्या नव्या कार्याध्यक्षाला देश आणि राज्यातील परिस्थिती समजण्यास मदत होईल. तसेच कार्यकर्त्यांनाही समजून घ्यायला वाव मिळेल,” असे मत नरेंद्र राणेंनी व्यक्त केले.