‘काँग्रेसच्या सहवासात बिघडले ठाकरे सरकार’

अर्णव गोस्वामी यांना अटक; आशिष शेलारांनी साधला राज्य सरकारवर निशाणा

मुंबई -रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णव गोस्वामी यांना पोलिसांनी अटक केली आहे. यावरून भाजपने राज्य सरकारला घेरण्यास सुरुवात केली आहे. काँग्रेसच्या सहवासात बिघडले ठाकरे सरकार, अशी टीका भाजप नेते आशिष शेलार यांनी केली आहे.

आशिष शेलार म्हणाले कि, एका प्रकरणात राज्य सरकारला उघडे पाडले म्हणून पत्रकार राहुल कुलकर्णीला अटक, सरकार विरोधात सोशल मिडियावर बोलणाऱ्या निवृत्त नेव्ही अधिकाऱ्यांसह सामान्य माणसाला ठेचून काढणे नित्याचेच झाले. आता सरकारला खडा सवाल विचारणाऱ्या संपादकाच्या हातात बेड्या. वा रे वा लोकशाही सरकार, अशा शब्दात त्यांनी महाविकास आघाडीवर टीका केली आहे.

काँग्रेसच्या सहवासात बिघडले ठाकरे सरकार. हाच का तुमचा लोकशाही कारभार? दुर्दैवाने, लोकशाहीचा आजचा काळा दिवस. महाराष्ट्र आणिबाणीच्या दिशेने जात आहे का? असाही सवाल आशिष शेलार यांनी केला आहे.

रिपब्लिक चॅनेलचे संपादक अर्णब गोस्वामी यांना अटक

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.