मोहित सुरी आणि एकता कपूर सध्या ‘एक विलेन’च्या दुसऱ्या सिक्वलच्या तयारीत आहेत. अभिनेता आदित्य राय कपूरने हा चित्रपट नकारत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता. कारण मोहित आणि आदित्य यांनी अनेक चित्रपटात एकत्रित काम केलेले आहे.
आदित्यने गमविलेल्या या संधीचा फायदा अर्जुन कपूरला झाला आहे. या चित्रपटात अर्जुन कपूरने एंट्री केली असून तो जॉन अब्राहमला ‘एक विलेन-2’मध्ये टक्कर देताना दिसणार आहे. तसेच अर्जुनलाही सद्यस्थितीत एका चित्रपटाची आवश्यकता होती. कारण बोनी कपूरच्या मुलाचे मागील काही चित्रपट बॉक्स ऑफिसवर यश मिळवू शकलेले नाही.
मोहित आणि अर्जुनने यापूर्वी ‘हाफ गर्लफ्रेंड’मध्ये एकत्रित काम केलेले असल्याने ते एकमेकांना चांगल्या प्रकारे ओळखतात. या चित्रपटात दिशा पाटणी आणि तारा सुतारियाही झळकणार आहेत.
दरम्यान, ‘एक विलेन’ चित्रपट 2014 मध्ये प्रदर्शित झाला होता. यात रितेश देशमुख, श्रद्धा कपूर आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या. या चित्रपटाने 100 कोटींहून अधिकचा गल्लाही जमविला होता. तसेच या चित्रपटातील गाणीही सुपरहिट ठरली होत.