मुंबई – बॉलीवुड एक्ट्रेस करीना कपूर आपल्या हटके अंदाजाने नेहमीच सिनेप्रेक्षकांचे मने जिंकत असते. बेबोचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर नेहमीच ट्रेण्डिंग असतात. यातच सध्या तिच्या एका व्हिडिओने सोशल मीडियावर सर्वांना आश्चर्यात टाकेल आहे. करीनचा हा व्हिडिओ चांगलाच वायरल होत आहे. दरम्यान, या व्हिडिओमध्ये तिला प्रश्न विचारला होता की तू कपूर आणि खान यापैकी कुठल्या आडनावाची निवड करशील? यावर तिने जे उत्तर दिल्या त्यामुळे तिच्या फॅन्सने करिनाची स्तुती केली आहे.
एका कार्यक्रमा दरम्यान, अँकरने करीनाला कपूर आणि खान यापैकी कुठल्या आडनावाची निवड करशील? असा प्रश्न विचारला असता तिने उत्तर दिले की,’मला यापैकी कुठल्याही आडनावाला निवडण्याची गरज नाही कारण मी करीना कपूर खान आहे. मी भाग्यशाली आहे की मी दोन्ही आहे…तिच्या या उत्तराने सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. तत्पूर्वी, मेलबर्न क्रिकेट क्लबच्या स्टेडियमवरून किरणाने विश्वचषकाचे अनावरण केले होते. याचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले होते.