Entertainment । अभिनेत्री विद्या बालनने उत्तम अभिनयाने लाखो लोकांची मनं जिंकली आहेत. ती नेहमी सोशल मीडियाद्वारे लोकांच्या संपर्कात राहते. सोशल मीडियावर तिचे अनेक फॉलोअर्स आहेत. तिच्या चित्रपटांमुळे ती नेहमीच चर्चेत राहिली आहे. मात्र सध्या ती एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. अभिनेत्री विद्या बालनने नुकत्याच एक शोमध्ये तिच्या लव्ह स्ट्रोरीबाबत सांगितले आहे.
अभिनेत्री विद्या बालनने या शोमध्ये तिचे काम, वैयक्तिक आयुष्य, लव्ह लाईफ आणि लग्नाविषयी मोकळेपणाने सांगितले. तिने सिद्धार्थ रॉय कपूरसोबतच्या तिच्या नात्याबद्दल आणि लग्नाआधी हे सर्वांपासून कसे गुपित ठेवले याबद्दल सांगितले.
विद्या बालनने निर्माता सिद्धार्थ रॉय कपूरला बराच काळ डेट केल्यानंतर लग्न केले, परंतु त्याबद्दल कोणालाच विशेष माहिती नव्हती. विद्याच्या आयुष्यात कोण आहे किंवा ती कोणाला डेट करत आहे हे लोकांना माहीत नव्हते. याबाबत विद्याने सांगितले की, त्यावेळी पापाराझी संस्कृती नुकतीच सुरू झाली होती आणि दोघांनाही त्यांच्या नात्याबद्दल लोकांना कळावे असे वाटत नव्हते.’
विद्या बालन म्हणाली,’त्यावेळी पापाराझी संस्कृती नुकतीच सुरू झाली होती आणि मला हे सर्व गुपित ठेवायचे होते. मला आठवते की आमच्या काही सुरुवातीच्या डेट कारमध्ये झाल्या होत्या. आम्ही नुसते इकडे तिकडे फिरायचो, वांद्रे ते नगरला जायचो आणि परत यायचो. पण तो काळ खूप छान होता. हे खूप रोमांचक होते आणि मला वाटते की ते मजेदार होते कारण ते थोडे गुपित होते, ज्याचा मी खूप आनंद घेतला. तो काळ खूप चांगला होता.”
विद्या बालनच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती ‘दो और दो प्यार’ मध्ये दिसणार आहे. तिच्यासोबत प्रतीक गांधी, इलियाना डिक्रूझ आणि सेंधील राममूर्ती यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.