तोयबाच्या आणखी एका दहशतवाद्याला पंजाबमध्ये अटक

चंडीगढ  – पाकिस्तानस्थित लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेच्या आणखी एका सदस्याला पंजाबमध्ये अटक करण्यात आली. त्यामुळे त्या राज्यात तीन दिवसांत तोयबाचे तीन दहशतवादी जाळ्यात आले आहेत.

पंजाबमध्ये गुरूवारी जम्मू-काश्‍मीरच्या शोपियॉंचे रहिवासी असणाऱ्या तोयबाच्या दोन दहशतवाद्यांना पकडण्यात आले. काश्‍मीर खोऱ्यात दहशतवादी हल्ले घडवण्यासाठी शस्त्रास्त्रे आणि दारूगोळ्याची तस्करी करण्याच्या प्रयत्नात ते होते.

अटकेनंतर त्यांनी दिलेल्या माहितीमुळे त्यांचा तिसरा साथीदार जावेद अहमद बट याच्यापर्यंत पोलीस पोहचले. जावेद हाही शोपियॉंचाच रहिवासी आहे. त्या तिघांच्या अटकेमुळे तोयबाचे विविध राज्यांत पसरलेले जाळे उघडकीस येण्यास मदत होणार आहे. तोयबाच्या दहशतवाद्यांना पंजाबमध्ये कुणाकडून शस्त्रास्त्रे आणि इतर मदत पुरवली जाते, याचा शोध पोलीस घेत आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.