अमेरिकेत भारतीय वंशाच्या डॉक्‍टरची किमया

करोनाग्रस्त महिलेवर गुंतागुंतीचे फुफ्फुस प्रत्यारोपण

न्यूयॉर्क, दि. 13 – अमेरिकेतील भारतीय वंशाच्या डॉक्‍टरने करोनाग्रस्त महिलेवर यशस्वी फुफ्फुस प्रत्यारोपण केले. डॉ. अंकित भरत यांच्या नेतृत्वाखाली वैद्यकीय पथकाने ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया केली. अमेरिकेतील संबंधित महिलेची फुफ्फुसे करोना व्हायरसमुळे पूर्णपणे निकामी झाली होती. शस्त्रक्रियेनंतर तिच्यावर दोन्ही फुफ्फुसांचे प्रत्यारोपण करण्यात आले. करोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर अमेरिकेत झालेली अशा प्रकारची ही पहिली शस्त्रक्रिया मानली जाते.

करोनाग्रस्त महिलेची प्रकृती चिंताजनक होती. प्रत्यारोपणाशिवाय तिला वाचवणे अशक्‍य होते, कारण गेल्या दोन महिन्यांपासून ती हृदय आणि फुफ्फुस यांना कृत्रिमरीत्या सहाय्य करणाऱ्या उपकरणांच्या मदतीने श्‍वासोच्छ्वास करत होती. डॉक्‍टरांच्या टीमचे नेतृत्व करणाऱ्या भारतीय वंशाच्या डॉ. अंकित भरत यांनी हे गुंतागुंतीचे ऑपरेशन केले. कोविडमुळे प्रकृती गंभीर असलेल्या रुग्णांना वाचवण्यासाठी प्रत्यारोपण हा एकमेव योग्य मार्ग असू शकतो, असे मत डॉ. अंकित यांनी शस्त्रक्रियेनंतर व्यक्‍त केले.

डॉ. अंकित म्हणाले, मी निश्‍चितपणे सांगू शकतो की करोनामुळे बऱ्याच रुग्णांच्या फुफ्फुसावर गंभीर परिणाम झाले असतील. मात्र, प्रत्यारोपणामुळे अनेक जणांचे प्राण वाचू शकतात, असा विश्‍वास त्यांनी व्यक्‍त केला. डॉ. अंकित भरत यांच्या नेतृत्वाखाली डॉक्‍टरांच्या टीमने केलेल्या यशस्वी फुफ्फुस प्रत्यारोपण शस्त्रक्रियेमुळे महिलेला जीवदान मिळाले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.