नवी दिल्ली – पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेस आमदार तमोनाश घोष यांचा करोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. वयाच्या 60 व्या वर्षी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. घोष यांच्या निधनाने पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही शोक व्यक्त केला आहे.
तमोनाश घोष यांची करोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्याने त्यांना कोलकत्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र अन्य आजारांमुळे त्यांची प्रकृती खालावली होती. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ट्वीट करून तमोनाश घोष यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
अत्यंत अत्यंत दु:खद. तमोनाश घोष हे फालता मतदारसंघातून तीन वेळा आमदार होते. 1998 पासून ते पक्षाचे कोषाध्यक्ष राहिले होते. त्यांचा निरोप घेताना निरतिशय दु:ख होत आहे. तमोनश घोष 35 वर्षांहून अधिक काळ आमच्यासोबत होते. जनता आणि पक्षासाठी त्यांनी स्वतःला समर्पित केले होते. त्यांनी सामाजिक कार्य करुन मोठे योगदान दिले, अशी भावना ममता बॅनर्जी यांनी व्यक्त केल्या आहेत.
Tamonash Ghosh has left a void that will be difficult to fill. On behalf of all of us, heartfelt condolences to his wife Jharna, his two daughters, friends and well-wishers: West Bengal Chief Minister Mamata Banerjee. (2/2) https://t.co/qxmpwqLQvY
— ANI (@ANI) June 24, 2020
दरम्यान, याआधीही १० जून रोजी द्रमुकचे आमदार जे. अंबाजगन यांचा करोनामुळे मृत्यू झाला होता.