सातारा -जिल्ह्यातील आणखी 27 करोनाबाधितांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी शनिवारी दिली. त्यामुळे जिल्ह्याती करोनाबळींच्या संख्येने 1200चा टप्पा ओलांडला आहे. जिल्ह्यातील करोनाबळींची एकूण संख्या आता 1214 झाली आहे.
क्रांतीसिंह नाना पाटील जिल्हा सर्वसाधारण रुग्णालयात उपचार घेत असलेल्या आसनगाव ता. सातारा येथील 69 वर्षीय महिला, जांब ता. वाई येथील 60 वर्षीय पुरुष, शिरवळ येथील 84 वर्षीय पुरुष, निझरे ता. जावळी येथील 50 वर्षीय पुरुष, देऊर ता. कोरेगाव येथील 89 वर्षीय पुरुष, बांबवडे ता. पाटण येथील 46 वर्षीय पुरुष, निगडी वंदन ता. सातारा येथील 54 वर्षीय पुरुष तसेच जिल्ह्यातील विविध खासगी रुग्णालयांमध्ये दहिवडी ता. माण येथील 78 वर्षीय पुरुष,
कोयना वसाहत ता. कराड येथील 76 वर्षीय पुरुष, खटाव येथील 52 वर्षीय पुरुष, साजूर ता. कराड येथील 73 वर्षीय पुरुष, मांडवे ता. सातारा येथील 88 वर्षीय पुरुष, म्हसवड ता. माण येथील 68 वर्षीय पुरुष, बांगरवाडी ता. माण येथील 67 वर्षीय महिला, कारंडेवाडी ता. माण येथील 60 वर्षीय पुरुष, वावरहिरे ता. माण येथील 65 वर्षीय महिला, सातारा येथील 69 वर्षीय पुरुष,
दहिवडी ता. माण येथील 53 वर्षीय पुरुष, दुधेबावी ता. फलटण येथील 32 वर्षीय पुरुष, नागठाणे ता. सातारा येथील 77 वर्षीय महिला, वडूज ता. खटाव येथील 79 वर्षीय पुरुष, राजसपुरा पेठ ता. सातारा येथील 57 वर्षीय पुरुष, करंजे पेठ ता. सातारा येथील 74 वर्षीय पुरुष तर करंजे ता. सातारा येथील 55 वर्षीय महिला, मंगळवार पेठ ता. सातारा येथील 69 वर्षीय पुरुष, कराड येथील 74 वर्षीय महिला, दत्तनगर ता. फलटण येथील 48 वर्षीय पुरुष अशा एकूण 27 करोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी सांगितले.