वडूज,(प्रतिनिधी) – येथील बाजार पटागंणाच्या पाठीमागे अवैध जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकत जुगार खेळणाऱ्या सात जणावर कारवाई करत जुगाराचे साहित्य व रोख रक्कम एकतीस हजार रुपये, सात मोबाईल असामुद्देमाल जप्त केला आहे.
याबाबत पोलीस ठाण्यातून मिळालेली अधिक माहिती अशी, पोलिस निरीक्षक घनशाम सोनवणे व स पो नी.अमोल माने यांना खास बातमीदारा मार्फत बेकायदेशीर बिना परवाना पत्त्याच्या डावावर पैसे स्वीकारून तीन पाणी पत्त्यांचा डाव अशी माहिती मिळाली. त्यानुसार सोमवार, दि. 29 रोजी दोन वाजण्याचे सुमारास वडूज गावचे हद्दीत सुधीर फर्निचरचे दुकानासमोर झाडाखाली पोलिसांनी छापा टाकला.
तिथे जुगार खेळताना शिवाजी सर्जेराव दळवी (वय 42) , सुरज अशोक जाधव (वय 32), सुरेश बुवाजी काळे( वय 48), सुनिल सुभाष पवार (वय 32) ,दिलीप यशवंत लोहार( वय 63 ) , संदिप खाशाबा मदने (वय 37), पृथ्वीराज उर्फ महेश बाळु चव्हाण (वय 35, सर्व रा.वडूज ) हे तीन पानी जुगार खेळत होते. याबाबतची फिर्याद कॉ्स्टेबल संदीप झगडे यांनी दिली.या कारवाईत दर्याबा नरळे, वाघमारे, लवळे आदींनी सहभाग घेतला .
दरम्यान, रात्री उशिरा मनोज दिलीप जाधव (वय 36, रा. वडुज ता. खटाव) हा शिवाजी चौक वडूज येथे जयराज बा समोरील श्री पान शाँपमध्ये स्वत: चे फायदासाठी लोकांकडून आकडयावर पैसे स्विकारुन मुंबई मटका नावाचा जुगार चालवत होता. त्याच्याकडून जुगाराचे साहित्य व रोख रक्कम असा एकुण 955 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. त्याच्या विरुध्द महाराष्ट्र जुगार कायदा कलम 12 (अ) प्रमाणे फिर्याद दाखल करण्यात आली आहे.