मुंबई – अभिनेत्री मिष्टी मुखर्जीचं शुक्रवारी रात्री निधन झालं आहे. वयाच्या 27 व्या वर्षी मिष्टी मुखर्जीने अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून ती रुग्णालयात उपचार घेत होती. मात्र तिची प्राणज्योत शुक्रवारी रात्री उशिरा मालवली. मिष्टी मुखर्जी हिला किडनीचा आजार होता.
2012 पासून मिष्टी मुखर्जीने तिच्या करिअरला सुरुवात केली होती. लाइफ की तो लग गयी हा तिचा पहिला चित्रपट होता. त्यानंतर ती काही चित्रपटांमध्ये झळकली मात्र बिग बजेट सिनेमा तिला मिळाला नव्हता. 2014 मध्ये मिष्टी मुखर्जीवर सेक्स रॅकेट चालवल्याचाही आरोप झाला होता त्यावेळी तिच्या नावाची बरीच चर्चा झाली होती.