jammu-kashmir : जम्मू-काश्मीरमधील (jammu-kashmir) अनंतनाग (Anantnag) जिल्ह्यात सुरू असलेल्या चकमकीत शुक्रवारी आणखी एक जवान शहीद झाला झाला असल्याची माहिती समोर येत आहे. आतापर्यंत दहशतवादी (Terrorists) आणि लष्करात (Indian Army) झालेल्या धुमश्चक्रीत शहीद जवानांची संख्या चार झाली आहे.,
अनंतनाग जिल्ह्यात दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत चार जवानांना देशाने गमावले आहे. भारतीय लष्करानेही दहशतवाद्यांचा (Terrorists) खात्मा करण्यासाठी खोऱ्यात मोर्चेबांधणी केली आहे.
शुक्रवारी सकाळपासून लष्कराच्या 10 विशेष पथकांनी खोऱ्यातील जंगलात उतरून दहशतवाद्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.
क्वाडकॉप्टर आणि ड्रोनचीही मदत घेतली जात आहे. चकमकीनंतर हे दहशतवादी जंगलात जाऊन लपले असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, आज प्राण गमावलेल्या चौथ्या सैनिकाची ओळख अद्याप समोर आलेली नाही.
याआधी बुधवारी लष्कराचे (Indian Army) राष्ट्रीय रायफल्स युनिट कमांडिंग ऑफिसर (कर्नल) मनप्रीत सिंग, कंपनी कमांडर (मेजर) आशिष आणि जम्मू-काश्मीर पोलिसांचे डीएसपी हुमायून शहीद झाले होते. कर्नल मनप्रीत आणि आशिष यांना आज अंतिम निरोप देण्यात येणार आहे.
कोकरनागच्या जंगलात सकाळपासून स्फोटांचा आवाज
अनंतनाग (Anantnag)च्या घटनेनंतर लष्कराने दहशतवाद्यांना घेरल्याचे माहिती समोर येत आहे. सकाळी पुन्हा कोकरनागच्या जंगलात शोधमोहीम सुरू झाली आहे. पहाटे चकमक परिसरातून तीन स्फोटांचे आवाज ऐकू आले.
हेरॉन ड्रोनपासून पॅरा कमांडो (Para Commando from Heron Drone) पर्यंत या कारवाईत सहभागी आहेत. पर्वतांमध्ये लपलेल्या दहशतवाद्यांना ठार करण्यासाठी सुरक्षा दल अत्याधुनिक शस्त्रांचा वापर करत आहेत. दहशतवादी पळून जाऊ नयेत, यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
ड्रोन आणि क्वाडकॉप्टरच्या सहाय्याने दहशतवाद्यांचा शोध सुरू
समोर आलेल्या माहितीनुसार, जंगलात लपून बसलेल्या दहशतवाद्यांची संख्या 2 ते 3 असल्याचे म्हटले जात आहे. यातील दोन दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे सांगण्यात येत आहे. बुधवारी या दहशतवाद्यांशी सुरक्षा दलांची चकमक झाली. हल्ल्यानंतर हे दहशतवादी घटनास्थळावरून पळून गेले.
गेल्या दोन दिवसांपासून जंगलात लपून बसलेल्या दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी ड्रोन आणि क्वाडकॉप्टर तैनात केले आहेत. हे दहशतवादी पाकिस्तानच्या लष्कर-ए-तैयबा (Lashkar-e-Taiba) ची प्रॉक्सी द रेझिस्टन्स फ्रंटशी संबंधित आहेत.