Rajasthan Election 2023 : राजस्थानमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजप पूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरला आहे. गुरुवारी (१४ सप्टेंबर) प्रचारासाठी आलेले केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी राज्यातील काँग्रेस सरकारवर जोरदार हल्ला बोल केला. भाजप राजस्थान येथे रामराज्य निर्माण करून भ्रष्टाचारमुक्त करेल, असे त्यांनी म्हटले आहे.
भिलवाडा येथे जाहीर सभेला संबोधित करताना अनुराग ठाकूर म्हणाले, ‘भाजपचा सबका साथ, सबका विकास यावर विश्वास आहे. राजस्थानमध्ये सरकार आल्यावर आम्ही राज्य भ्रष्टाचारमुक्त करू, तसेच भाजप सरकारमुळे महिलांवरील गुन्हे आणि जंगलराज संपेल. आम्ही रामराज्य निर्माण करू.’
‘काँग्रेसला सनातन धर्म नष्ट करायचाय’ ( Rajasthan Election 2023 )
अनुराग ठाकूर सभेत बोलले, काँग्रेसला सनातन धर्माची लाज वाटते. त्यांना सनातन धर्म नष्ट करायचा आहे. त्यांना हिंदूंचा अपमान करून संविधान चिरडायचे आहे. सनातन धर्माचा नाश करू, असे काँग्रेस व त्यांच्या समर्थक पक्षांचे नेते रोज प्रचार करत आहेत. आता त्यांनी पत्रकारांवरही बहिष्कार टाकण्यास सुरुवात केली आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. चेन्नई असो की बंगाल, भीतीपोटी तक्रारी केल्या जात आहेत.
अनुराग ठाकूर यांनी राजस्थानच्या अशोक गेहलोत सरकारवरही अनेक गंभीर आरोप केले. गांधी कुटुंबावर हल्ला करताना अनुराग ठाकूर काँग्रेस निशाणा साधत बोलले की, सर्वजण जावई (रॉबर्ट वाड्रा) तसेच राहुल गांधी यांना खूश करण्यात व्यस्त आहेत.
पीएम मोदींचा अपमान केल्याचा आरोप ( Rajasthan Election 2023 )
अनुराग ठाकूर यांनी काँग्रेससह मित्रपक्षांच्या नेत्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात अपमानास्पद शब्द वापरल्याचा आरोपही केला. ते म्हणाले, काँग्रेस नेतेने म्हटले होते की, ‘चहा विकणारा देश कसा चालवणार? काँग्रेसने आपल्या राजवटीत देशाची तिजोरी रिकामी केली होती. पण मोदी सरकारने देशवासीयांसाठी घरे तसेच थिंक टँक बांधून ती पुन्हा भरून काढली आहे.’
राजस्थान व्यतिरिक्त मध्य प्रदेश, छत्तीसगड त्याचबरोबर तेलंगणामध्ये या वर्षी नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यासाठी सर्वच पक्षांनी प्रचार सुरू केला आहे. ( Rajasthan Election 2023 )