मुंबई – माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचं नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘स्त्री शक्ती‘ला गौरवान्वित करणारे हे गीत ८ मार्च ला जागतिक महिला दिनी प्रेक्षांकाच्या भेटीला येणार आहे.
जेव्हा ती संघर्षपथावर निघाली तेव्हा तिल-
कुणी म्हणाले वेडी कुठली,
कुणी म्हणाले खुळी..तिने मात्र जगाला दाखवून दिले की तिच्या प्रगतिचा प्रवाह रोकणे शक्य नाही !
‘स्त्री शक्ती‘ला गौरवान्वित करणारे माझे नवीन गीत
नक्की पाहा, ८ मार्च रोजी, जागतिक महिला दिनी !#InternationalWomensDay pic.twitter.com/RUzbxsOb4L— AMRUTA FADNAVIS (@fadnavis_amruta) March 5, 2021
गेल्या काही काळात त्या सामाजिक कार्यांसोबतच गायन क्षेत्रातही प्रचंड सक्रिय आहेत. दरम्यान त्यांचं एक नवं गाणं लवकरच रसिकांच्या भेटीस येत आहे. अमृत फडणवीस यांनी एका ट्विटच्या माध्यमातून या आगामी गाण्याची घोषणा केली.
याबाबत त्यांनी ट्विट केले आहे की,’जेव्हा ती संघर्षपथावर निघाली तेव्हा तिल- कुणी म्हणाले वेडी कुठली, कुणी म्हणाले खुळी.. तिने मात्र जगाला दाखवून दिले की तिच्या प्रगतिचा प्रवाह रोकणे शक्य नाही ! ‘स्त्री शक्ती‘ला गौरवान्वित करणारे माझे नवीन गीत नक्की पाहा, ८ मार्च रोजी, जागतिक महिला दिनी !#InternationalWomensDay’ हे ट्विट केले आहे. यापूर्वी अमृता फडणवीस यांनी ‘डाव’ या मराठी चित्रपटातील ‘अंधार’ हे गाणं गायलं होतं.