मुंबई – शिंदे गटातील मंत्री तानाजी सावंत हे सध्या आपल्या दौऱ्यामुळे चांगलेच चर्चेत आले आहेत. सावंत त्यांच्या दौऱ्याची माहिती देणारे पत्रक सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे. मुंबई पुणे मुंबई असा असलेला हा दौरा चांगलाच चर्चेत आला आहे. अशात राष्ट्रवादी काँग्रेसकडून देखील सावंत यांच्या दौऱ्याबाबत निशाणा साधण्यात आला आहे.
सांवत यांचा हा दौरा एका कार्यालयातुन दुसऱ्या कार्यालयात तर दुसऱ्या कार्यालयातून घरी असा आहे त्यामुळे सध्या राजकीय वर्तुळात याची जोरदार चर्चा सुरु आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी देखील या दौऱ्यावर निशाणा साधत एक ट्विट केलं आहे. आपल्या ट्विटमध्ये मिटकरी म्हणतात,”हे आहेत आमचे आरोग्य मंत्री ! एकट्या पुणे शहरात एकाच दिवसात हजारो किलोमीटरचा दौरा करण्याचा नवा विक्रम ! काय ते मंत्री ? काय त्यांचे नाव ? आणि काय त्यांचा दौरा ?? एकदम OKK OKK”
हे आहेत आमचे आरोग्य मंत्री ! एकट्या पुणे शहरात एकाच दिवसात हजारो किलोमीटरचा दौरा करण्याचा नवा विक्रम !!
” काय ते मंत्री ? काय त्यांचे नाव ? आणि काय त्यांचा दौरा ??
एकदम OKK OKK pic.twitter.com/vWDIVntqlU— आ. अमोल रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) August 27, 2022
तानाजी सावंत यांच्या ३ दिवसीय दौऱ्याचं परिपत्रक सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. त्यानुसार, २६ ऑगस्ट रोजीचा दौरा हा मुंबईहून पुणे येथे आगमन, निवासस्थानी मुक्काम एवढाच आहे. तर, २७ ऑगस्ट रोजी निवासस्थान येथून पुण्यातील बालाजी नगर कार्यालय, तेथून कात्रज येथील कार्यालय. त्यानंतर, कात्रजच्या कार्यालयातून बालाजी नगर कार्यालय आणि येथून पुन्हा कात्रज निवासस्थान असा दौरा असणार आहे.मंत्री तानाजी सावंत यांच्या दौऱ्याबाबत राजकीय वर्तुळातील प्रतिक्रियांप्रमाणे नेटकाऱ्यानी देखील हा विषय चर्चेचा केला आहे. त्यामुळे सावंत यांचा हा कार्यालय ते घर दौरा चर्चेचा विषय बनला आहे.