Amol Mitkari Audio Clip – राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी एका गुन्हेगाराचा बचाव करण्यासाठी थेट अकोल्याच्या पोलिस अधीक्षकांवर दबाव टाकल्याची थक्क करणारी घटना उजेडात आली आहे. त्यांची यासंबंधीची एक ऑडिओ क्लिप चांगलीच व्हायरल झाली आहे.
सदर गुन्हेगारावर गुन्हा दाखल केल्यास मी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे किंवा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलेन, असे ते या अधिकाऱ्याला धमकावताना या ऑडिओ क्लिपमध्ये ऐकू येत आहे.
मिटकरी व अकोल्याचे जिल्हा पोलिस अधीक्षक बच्चन सिंह यांच्या दोघांमधील एका संभाषणाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. या क्लिपमध्ये अमोल मिटकरी अकोल्यातील सतीश नावखेडे नामक एका सराईत गुन्हेगारावर गुन्हा दाखल न करण्याची विनंती करत आहेत.
तसेच त्याच्यावर गुन्हा दाखल केला तर मी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे किंवा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर बोलेन, असे ते या प्रकरणी म्हणताना या क्लिपमध्ये ऐकू येत आहे.
काय म्हणतात अमोल मिटकरी? Amol Mitkari Audio Clip
आपण ( बच्चन सिंह ) माझ्याशी कायम जोरात बोलता. मी एका सत्ताधारी पक्षाचा आमदार आहे. येत्या अधिवेशनात मी हा मुद्दा मांडणार आहे. एखादा गुन्हेगार ( सतीश वानखेडे ) सुधारण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला संधी दिली पाहिजे. स
दर गुन्हेगार हा माझा पक्षाशी संबंधित नाही किंवा तो माझा कार्यकर्ताही नाही. याविषयी मी यापुढे तुमच्याशी बोलणार नाही. बोलायचे असल्यास मी थेट मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांशी बोलेन, असे अमोल मिटकरी सदर ऑडिओ क्लिपमध्ये पोलिस अधीक्षकांना बोलताना ऐकू येत आहे.
कोण आहे सतीश वानखडे?
सतीश वानखडे हा अकोल्यातील कृषीनगर परिसरातील पंचशीलनगर भागातला एक सराईत गुन्हेगार आहे. अकोल्यातील विविध पोलिस ठाण्यात त्याच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत.
२०१५ मध्ये वानखेडेवर अकोला पोलिसांनी तडीपारीची देखील कारवाई केली आहे. तसेच, धनंजय बिल्लेवार या व्यक्तीवर वानखडेने जीवघेणा हल्ला केला होता. या हल्यात बिल्लेवारच्या हाताची बोटे कापली गेली होती.