Indian Premier League 2024 Schedule Announcement Updates : आयपीएल 2024 चे बहुप्रतिक्षित वेळापत्रक अखेर जाहीर झाले आहे. याबाबत अनेक दिवस मीडिया रिपोर्ट्स येत होते. मात्र आता याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. पहिला सामना कधी व कुठे खेळला जाईल यासह स्पर्धेचे सर्व डिटेल्स जाणून घेऊया.
IPL मधील पहिला सामना 22 मार्च रोजी महेंद्रसिंग धोनी (MS Dhoni) चा संघ चेन्नई सुपर किंग्स (CSK) आणि फाफ डू प्लेसिसच्या रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) यांच्यात होणार आहे. हा सामना चेन्नईत होणार आहे.
सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पहिल्या 21 सामन्यांचे वेळापत्रक (22 मार्च ते 7 एप्रिल) जाहीर करण्यात आले आहे. हे 21 सामने दोन आठवड्यांच्या कालावधीत होणार असून 10 शहरांमध्ये 21 सामने खेळवले जातील. विशेष म्हणजे दिल्ली कॅपिटल्स आपला प्रारंभिक सामना विझागमध्ये खेळणार आहे. आयपीएल 2024 मधील उर्वरित सामन्यांचे वेळापत्रक नंतर जाहीर केले जाईल. उद्घाटनाचा सामना रात्री 8 वाजता सुरू होईल. उर्वरित सामने दुपारी 3.30 किंवा 7.30 वाजता सुरू होतील.
The wait is over 🥳
𝙎𝘾𝙃𝙀𝘿𝙐𝙇𝙀 for the first 2⃣1⃣ matches of #TATAIPL 2024 is out!
Which fixture are you looking forward to the most 🤔 pic.twitter.com/HFIyVUZFbo
— IndianPremierLeague (@IPL) February 22, 2024
IPL 2023 च्या पहिल्या 21 सामन्यांचे वेळापत्रक….
1. चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (22 मार्च, चेन्नई, रात्री 8.00)
2. पंजाब किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स (23 मार्च, मोहाली, दुपारी 3.30 वा.)
3. कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद (23 मार्च, कोलकाता, संध्याकाळी 7.30)
4. राजस्थान रॉयल्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स (24 मार्च, जयपूर, दुपारी 3.30 वाजता)
5. गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्स (24 मार्च, अहमदाबाद, संध्याकाळी 7.30 वा)
6. रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध पंजाब किंग्ज (25 मार्च, बेंगळुरू, संध्याकाळी 7.30 वा.)
7. चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध गुजरात टायटन्स (26 मार्च, चेन्नई, संध्याकाळी 7.30 वा.)
8. सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध मुंबई इंडियन्स (27 मार्च, हैदराबाद, संध्याकाळी 7.30 वा)
9. राजस्थान रॉयल्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स (28 मार्च, जयपूर, संध्याकाळी 7.30 वा.)
10. रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स (29 मार्च, बेंगळुरू, संध्याकाळी 7.30 वा.)
Virat Kohli : ‘विराट-अनुष्का’ने मुलाचे नाव ठेवले ‘अकाय’, जाणून घ्या…. ‘Akaay’ चा नेमका अर्थ काय?
11. लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध पंजाब किंग्स (30 मार्च, लखनौ, संध्याकाळी 7.30 वा.)
12. गुजरात टायटन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद (31 मार्च, अहमदाबाद, 3.30 वा.)
13. दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज (31 मार्च, विझाग, संध्याकाळी 7.30 वा.)
14. मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स (1 एप्रिल, मुंबई, संध्याकाळी 7.30 वा.)
15. रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स (2 एप्रिल, बेंगळुरू, संध्याकाळी 7.30 वा.)
Virat Kohli : विराट-अनुष्का पुन्हा बनले आई-बाबा, वामिकाला भाऊ की बहिण? नावंही आलं समोर
16. दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स (3 एप्रिल, विझाग, संध्याकाळी 7.30 वा)
17. गुजरात टायटन्स विरुद्ध पंजाब किंग्ज (4 एप्रिल, अहमदाबाद, संध्याकाळी 7.30 वा.)
18. सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज (5 एप्रिल, हैदराबाद, संध्याकाळी 7.30 वा)
19. राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (6 एप्रिल, जयपूर, संध्याकाळी 7.30 वा)
20. मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स (7 एप्रिल, मुंबई, दुपारी 3.30 वाजता)
21. लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध गुजरात टायटन्स (7 एप्रिल, लखनौ, संध्याकाळी 7.30 वा)