नवी दिल्ली – लोकसभा निवडणुका जवळ येत असतानाच आता देशातील राजकीय वातावरणही चांगलेच तापू लागले आहे. केंद्रात सत्तांतर घडविण्यासाठी अनेक पक्ष एकत्र येताना दिसत आहेत. आज विरोधकांची एकत्र येत I.N.D.I.A ही आघाडी मुंबईत बैठक होणार आहे.
अशात खासदार अमोल कोल्हे यांनी याच अनुषंगाने एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. यामध्ये त्यांनी भाजपा आणि आरएसएसला ब्रांड मोदींवर विश्वास उरला नाही का? नितीन गडकरी यांना सर्वसमावेशक चेहरा म्हणून प्रक्षेपित केले जाईल का? 2024 च्या लोकसभा निवडणुका पाहता कोणाची हिंमत आहे? असे तीन प्रश्नही कोल्हे यांनी विचारले आहे.
❗क्या BJP और RSS को ब्रँड #मोदी पर भरोसा नहीं रहा?
❗क्या नितीन गडकरी जी को सर्वसमावेशक चेहरे के रूप मे प्रोजेक्ट किया जायेगा?2024 के लोकसभा चुनाव को देखे तो किसमें कितना है दम❓
इस मुद्दे को समझने के लिये ‘अमोल ते अनमोल’ युट्युब चैनल का व्हिडीओ जरूर देखे।
लिंक -… pic.twitter.com/fm11BXMyJZ
— Dr.Amol Kolhe (@kolhe_amol) August 31, 2023
सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये अमोल कोल्हे म्हणाले की,’पाटणा आणि बंगळुरुनंतर आता इंडिया आघाडीची बैठक मुंबईत पार पडते आहे. मुंबईत त्याचे बॅनरही लागले आहेत. जुडेगा भारत, जितेगा इंडिया अशी टॅगलाईनही त्यावर आहे. विरोधी पक्षाला अब की बार मोदी सरकार सारखी दमदार टॅगलाईन मिळाली आहे. बंगळुरुच्या बैठकीत विरोधकांच्या या आघाडीला इंडिया असं नाव देण्यात आलं.’
ते पुढे म्हणाले,’हे नाव ठेवलं गेल्यानं पंतप्रधान नरेंद्र मोदी असोत किंवा भाजपा असो त्यांना या नावावर टीका कशी करायची याचा ठोस पर्याय मिळालेला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या आघाडीला घमंडिया म्हटलं आहे. तसंच प्रत्येक अक्षरापुढचा डॉट वाचत इंडिया नावाची खिल्लीही उडवली. मात्र हे प्रयत्न करुनही पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून लक्ष्यभेद होऊ शकलेला नाही. आता मुंबईतल्या बैठकीतून विरोधी पक्षांना अनेक अपेक्षा आहेत. तर भाजपा याची वाट पाहते आहे की या आघाडीत कुठेतरी बिघाडी निर्माण होते का? काही वितुष्ट येतं का? ” असं कोल्हेंनी म्हटलं आहे.