न्हावरे : कोणीही सत्तेचे अमरत्व घेऊन आलेले नाही. अशी टीका शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केली. शिरुर येथील जुन्या मार्केट यार्ड परिसरात राष्ट्रवादीचे शिरुर-हवेली विधानसभा मतदार संघातील अधिकृत उमेदवार अँड. अशोक पवार यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दरम्यान झालेल्या सभेत खासदार डॉ. कोल्हे बोलत होते.
पुढे कोल्हे पुढे म्हणाले की, सत्ताधारी हे शेतकरी, कष्टकरी, नोकरदार यांच्या विरोधात आहेत. त्यामुळे सरकारच्या सूड बुद्धीला सामान्य जनता त्यांना उत्तर देईल. तसेच सध्याच्या भाजपा शासनाने फक्त फोडाफोडीचे राजकारण केले आहे. त्यांना जनतेचे काहीही घेणे-देणे नाही.असेही खासदार डॉ. कोल्हे म्हणाले. दरम्यान माजी आमदार अँड. अशोक पवार यांनी जोरदात शक्ती प्रदर्शनात शिरुर येथील तहसील कार्यालयात आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर, पुणे जिल्हा राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्ष वैशाली नागवडे, राष्ट्रवादीचे शिरुर तालुक अध्यक्ष रवी काळे, हवेली तालुका अध्यक्ष दिलीप वाल्हेकर, प्रसिद्ध उद्योगपती प्रकाशशेठ धारिवाल यांचे पुत्र आदित्य धारिवाल, शिरुर-हवेली विधानसभा मतदार संघातील सर्व प्रमुख पदाधिकारी, महिला व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.