मुंबई – बॉलीवूड मेगास्टार अमिताभ बच्चन आणि किंग खान शाहरुख खान हे दोघेही फिल्मी दुनियेचे मास्टर आहे. या दोघांचे जगभरात अनेक चाहते आहेत. अमिताभ आणि शाहरुख नेहमीच त्यांच्या अप्रतिम अभिनयाच्या जोरावर चाहत्यांची मने जिंकतात.
आता अलीकडेच अशी बातमी येत आहे की, 17 वर्षांनंतर दोघे पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहेत. 2006 मध्ये रिलीज झालेल्या ‘कभी अलविदा ना कहना’ या चित्रपटात हे दोन्ही स्टार एकत्र दिसले होते. शाहरुख खानने आस्क एसआरके सत्रात खुलासा केला आहे की 17 वर्षांनंतर अमिताभ बच्चनसोबत काम करताना मजा आली.
शाहरुख खानने त्याच्या आणि अमिताभ बच्चन यांच्या नवीन प्रोजेक्टच्या शूटिंगमधील फोटोवर प्रतिक्रिया दिली आहे. किंग खान 7 सप्टेंबर रोजी त्याच्या जवान चित्रपटाच्या रिलीजसाठी सज्ज आहे, दरम्यान एका चाहत्याने त्याला अमिताभ बच्चन यांच्यासोबतच्या चित्रावर टिप्पणी करण्यास सांगितले.
अभिनेत्याने उत्तरात लिहिले की, “इतक्या वर्षांनी बिग बींसोबत काम करताना खूप मजा आली. ते शूटसाठी आले आणि त्यांनी आशीर्वाद दिले आणि त्यांनी मला शर्यतीत हरवले.
असे बोलले जात आहे की, शाहरुख आणि अमिताभ बच्चन लवकरच एका चित्रपटात एकत्र दिसणार आहे, अशी शक्यता वर्तवली जात आहे की दोघेही डॉन 3 मध्ये दिसणार आहे. सध्या शाहरुख खान लवकरच जवानसोबत चित्रपटगृहात परतणार आहे. अॅटली दिग्दर्शित या चित्रपटात दीपिका पदुकोण, नयनतारा, प्रियमणी, विजय सेतुपती, सान्या मल्होत्रा आणि सुनील ग्रोव्हर यांच्याही भूमिका आहेत.