‘Kalki 2898 AD’ Amitabh Bachchan Look| दाक्षिणात्य सुपस्टार प्रभासचा ‘कल्कि 2898 एडी’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. विशेष म्हणजे त्याच्या या चित्रपटात अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन देखील झळकणार आहे. मागील काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या या चित्रपटातील अमिताभ बच्चन यांचा लुक समोर आला आहे.
निर्मात्यांनी शेअर केलेल्या चित्रपटातील अमिताभच्या नवीन लूकमध्ये ते एका जुन्या मंदिरात बसलेले दिसत आहेत. ते साधूच्या अवतारात दिसून येत आहेत. तसेच त्यांच्या चेहऱ्यावर पट्ट्या आहेत. यात ते आशेने सूर्यप्रकाशाकडे पाहत आहेत. या पोस्टरवर निर्मात्यांनी ‘आता तुम्हाला या व्यक्तिरेखेबद्दल माहिती मिळवण्याची वेळ आली आहे…’, असे लिहिले आहे. या सिनेमात अमिताभ बच्चन नेमकी कोणती भूमिका साकारणार हे 21 एप्रिल रोजी 7.15 मिनिटांनी स्टार स्पोर्ट्स इंडियावर मिळणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या लुकने सध्या अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे.
View this post on Instagram
‘कल्कि 2898 एडी’ या चित्रपटाचे दिग्दर्शन नाग अश्विन करणार आहेत. ‘कल्कि 2898 AD’ या चित्रपटामध्ये अमिताभ बच्चन यांच्यासोबतच प्रभास, दीपिका पादुकोण, कमल हसन हे कलाकार देखील महत्वाची भूमिका साकारणार आहेत. तेलुगू, हिंदी, तमिळ, मल्याळम, कन्नड आणि इंग्रजी भाषांमध्ये चित्रपट प्रदर्शित होणार आहे. पुढील महिन्यात 9 मे 2024 रोजी हा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.