Amit thackeray morcha SPPU : राज्यात सध्या सर्वच पक्षांकडून लोकसभेची तयारी सुरु आहे.अशात पुण्यामध्ये वेगवान राजकीय घडामोडी घडताना दिसत आहेत. आज पुण्यात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या कार्यकर्त्यांनी पुणे विद्यापीठावर मोर्चा काढला होता. या मोर्चाचे नेतृत्व मनसे नेते अमित ठाकरे हे करत होते. यादरम्यान अमित ठाकरे यांनी निवडणूक लढण्याबाबत देखील भाष्य केलं आहे.
विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी अमित ठाकरे यांनी पुण्यातील चतुःशृंगी ते सावित्रीबाई फुले विद्यापीठ असे मोर्चाचे आयोजन केले होते. यावेळी मनसेचे अनेक कार्यकर्ते मोर्चामध्ये सहभागी झाले होते. | Amit thackeray morcha SPPU
यावेळी अमित ठाकरे यांनी माध्यमांशी देखील संवाद साधला. यादरम्यान काल विद्यापीठाच्या कॅन्टीनमध्ये पोह्यात झुरळ मिळाले असल्याचे पुरावे त्यांनी दिले. याबाबतचा फोटो अमित ठाकरे यांनी दाखवला. वॅाशरुम आणि होस्टेलचेही काही फोटो त्यांनी दाखवले. | Amit thackeray morcha SPPU
आगामी काळात तुम्ही देखील निवडणूक लढवणार का ? असा सवाल देखील यावेळी अमित ठाकरेंना विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले,” राज साहेबांनी जबाबदारी दिली तर ते म्हणतील ती जबाबदारी मी स्वीकारेन. त्यांनी म्हटले तर लोकसभा लढवेल, विधानसभा लढवेल, नगरसेवक पण होईल. सरपंच ही होईल असं स्पष्ट मत यावेळी अमित ठाकरेंनी दिले.