Ranji Trophy 2024 Quarter-final Match, Musheer Khan Century : अलीकडेच सर्फराज खानने इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत पदार्पण केले. सर्फराज खानने पदार्पणाच्या कसोटीच्या दोन्ही डावात पन्नास धावांचा टप्पा पार करून एक विशेष विक्रम केला. त्याच वेळी, आता सर्फराज खानचा भाऊ मुशीर खाननेही आपल्या भावाच्या पावलावर पाऊल ठेवत दमदार कामगिरी केली आहे. वास्तविक, मुशीर खानने रणजी ट्रॉफीच्या उपांत्यपूर्व सामन्यात (Quarter-final) शानदार शतक झळकावले आहे. मुशीर खानचे हे पहिले प्रथम श्रेणीतील शतक आहे.
मुशीर खानने अंडर-19 विश्वचषक स्पर्धेत उत्कृष्ट फलंदाजी केली होती. त्याचवेळी, आता त्याने मुंबईसाठी रणजी ट्रॉफीच्या उपांत्यपूर्व सामन्यात शतक झळकावून चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. रणजी ट्रॉफीच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात मुंबईसमोर बडोद्याचे ( #MUMvBDA ) आव्हान आहे.
पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत मुशीर खानच्या शतकी खेळीच्या जोरावर मुंबईने 5 विकेट गमावत 248 धावा केल्या. मुशीर खान 216 चेंडूत 128 धावा करून खेळत आहे. त्याने आपल्या खेळीत 10 चौकार मारले आहेत. तत्पूर्वी, अजिंक्य रहाणे आणि पृथ्वी शॉसारखे मुंबईचे फलंदाज लवकर पॅव्हेलियनमध्ये परतले, पण मुशीर खानने संघाला संकटातून बाहेर काढले.
Stumps Day 1: Mumbai – 248/5 in 89.6 overs (Hardik Tamore 30 off 163, Musheer Khan 128 off 216) #MUMvBDA #RanjiTrophy #Elite #QF2
— BCCI Domestic (@BCCIdomestic) February 23, 2024
सर्फराज खान नंतर भाऊ मुशीरचा जलवा ..
मुशीर खानचा भाऊ सर्फराज खान याने इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत पदार्पण केले होते. सर्फराज खानने पदार्पणाच्या कसोटीच्या पहिल्या डावात 66 चेंडूत 62 धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत 9 चौकार आणि 1 षटकार मारला. यानंतर तो दुसऱ्या डावात 72 चेंडूत 68 धावा करून नाबाद परतला. यामुळे पदार्पणाच्या कसोटीनंतर सर्फराज खानने चांगलाच चर्चेत राहिला.
त्याच वेळी, आता सर्फराज खानचा भाऊ मुशीर खान प्रथम श्रेणी सामन्यात पहिले शतक केल्यानंतर सोशल मीडियावर सतत ट्रेंड करत आहे. मुशीर खान लवकरच टीम इंडियात प्रवेश करू शकतो, असा विश्वास सोशल मीडियावरील अनेक चाहत्यांना आहे.