Vasant More । मनसेचे डॅशिंग नेते वसंत मोरे सोशल मीडियावर चांगलेच सक्रिय असतात. मराठी माणसाच्या हक्काचा विषय असो वा एखाद्याला मदत करणं असो मोरे आपली प्रत्येक अपडेट सोशल मीडियावरून देत असतात. सोशल मीडियावर देखील त्यांचा मोठा चाहता वर्ग असून, त्यांची प्रत्येक पोस्ट नेहमीच ते चर्चेत असते. मात्र, काल त्यांच्या राजीनाम्याच्या पोस्ट मुळे एकच खळबळ निर्माण झाली होती.
साहेब मला माफ करा अशी पोस्ट शेअर करत वसंत मोरे यांनी मनसेला ‘जय महाराष्ट्र’ केला आहे.‘ अखेरचा जय महाराष्ट्र… साहेब मला माफ करा’ असं म्हणत वसंत मोरे यांनी मनसे पक्षाचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांना नमस्कार करत फेसबुक पोस्ट शेअर केली होती. यानंतर वसंत मोरे यांनी पत्रकार परिषद घेत सविस्तरपणे राजीनाम्याचं कारण स्पष्ट केले.
वसंत मोरे म्हणाले, मी राज ठाकरे किंवा मनसे या पक्षामुळे राजीनामा देत नाही तर पुणे शहरातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून माझ्या विरोधात होत असलेले पक्षांतर्गत गलिच्छ राजकारण यामुळे पक्षाचा राजीनामा देत आहे. असं मोरे यावेळी म्हणाले.
मात्र, अश्यातच आता वसंत मोरे यांच्या नाराजीचं खरं कारण समोर आलं आहे. ‘सोशल मीडियावर कमी व्यक्त व्हा…’, असे अमित ठाकरे यांनी वसंत मोरे यांना झापलं असल्याचं बोललं जात आहे. अमित ठाकरे यांनी झापल्यापासूनच वसंत मोरे नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
अमित ठाकरे यांच्या पुण्यातील एका मोर्च्यानंतर मोरेंनी फेसबूक पोस्ट केली होती. त्यावरून अमित ठाकरेंनी मोरेंची कानउघाडणी केली होती. तेव्हापासूनच या नाराजीला सुरूवात झालं असल्याचं बोललं जात आहे. एका प्रसिद्ध वृत्तसंस्थेने देखील या बातमीला दुजोरा दिला आहे. । Vasant More
‘… राज साहेबांचा फोन मला देऊ नको’ – वसंत मोरे । Vasant More
वसंत मोरे यांनी राज ठाकरेंचा त्यांना फोन आल्याचं सांगितलं. वसंत मोरे म्हणाले,’मला राज साहेबांचाही फोन एका पदाधिकाऱ्याच्या मोबाइलवर आला होता. पण त्या पदाधिकाऱ्याला मी एवढंच सांगितलं की, मी हात जोडतो. पण साहेबांचा फोन मला देऊ नको.
कारण आजवर संघटनेतील खरी परिस्थिती मी राज ठाकरे यांच्या कानावर घालत आलो होतो. त्यामुळे आता राजीनामा दिल्यानंतर राज ठाकरे यांच्याशी बोलून मी त्यांना दुखवू इच्छित नाही”, अशी भावना वसंत मोरे यांनी व्यक्त केली. । Vasant More