Raj Thackeray- MNS Vardhapan Din| महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आज 18 वा वर्धापन दिन आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने मनसे अध्यक्ष राज ठाकरे नाशिक दौऱ्यावर आहेत. यानिमित आज नाशिकमध्ये मनसेचा 18 वा वर्धापन दिन सोहळा पार पडणार आहेत. नाशिक हा मनसेचा कधीकाळी बालेकिल्ला राहिलेला आहे. या सोहळ्याचा निमित्ताने राज ठाकरे, अमित ठाकरे तसेच मनसेची राज्यातील वरिष्ठ नेतेमंडळी 7 मार्च रोजी नाशिक शहरात दाखल झाले आहेत.
यासाठी नाशिकच्या दादासाहेब गायकवाड सभागृहात मनसैनिकांनी जय्यत तयारी केली आहे. राज ठाकरेंच्या सभेसाठी भव्य व्यासपीठ उभारण्यात आलं असून जवळपास 5 हजार मनसैनिक तसेच पदाधिकारी दादासाहेब गायकवाड सभागृहात बसू शकतील, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. या मेळाव्यात आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाची पुढील वाटचाल आणि दिशा याबाबत राज ठाकरेमनसैनिकांना मार्गदर्शन करणार आहे. Raj Thackeray- MNS Vardhapan Din|
दरम्यान, राज ठाकरे यांनी नाशिकमधील काळाराम मंदिरात शुक्रवारी (ता. ८) त्यांनी मनसैनिकांसह आरती केली. यावेळी मनसैनिकांनी जय श्रीराम असा नारा दिला. त्यामुळे आगामी लोकसभा विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसेकडून हिंदुत्वाच कार्ड बळकट करण्याचा प्रयत्न केला जाण्याची शक्यता आहे. तसेच मध्यंतरी राज ठाकरे यांनी भाजप नेत्यांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याने मनसे महायुतीत सामील होणार, अशा चर्चा रंगल्या होत्या.
लोकसभेचे रणशिंग फुंकणार? Raj Thackeray- MNS Vardhapan Din|
राज ठाकरे यांनी आगामी लोकसभा निवडणुकीसंदर्भात मनसेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा सुरु ठेवली आहे. आगामी काळात मनसे राज्याच्या राजकारणात एकला चलोची भूमिका घेणार की युती करणार का याकडे लक्ष लागलं आहे. मनसेची स्थापना झाल्यानंतरच्या लोकसभा निवडणुका पक्षाकडून लढवण्यात आल्या. पण मनसेचा उमेदवार विजयी होऊ शकला नाही. यंदाच्या लोकसभेत मनसे आपले खाते उघडण्यात यशस्वी होणार का? हे पाहावे लागणार आहे.
हेही वाचा :