All England Open Badminton Championships 2024 : – दोन वेळची ऑलिम्पिक पदक विजेती पीव्ही सिंधूला गुरुवारी ऑल इंग्लंड ओपन 2024 महिला एकेरीच्या दुसऱ्या फेरीत गतविजेत्या प्रजासत्ताक कोरियाच्या (Republic of Korea )
‘एन से यंग’ कडून पराभव पत्करावा लागला. यासह तिचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं आहे.
बॅडमिंटन क्रमवारीत 11व्या स्थानावर असलेल्या पीव्ही सिंधूला बीडब्लूएफ ( BWF ) सुपर 1000 स्पर्धेच्या 16व्या फेरीत जागतिक क्रमवारीत पहिल्या स्थानावर असलेल्या कोरियन शटलरविरुद्ध 21-19, 21-11 असा पराभव पत्करावा लागला. सिंधूचा ‘ॲन से यंग’ विरुद्धचा हा सातवा पराभव ठरला.
कोरियन खेळाडू एका वर्षाहून अधिक काळ जबरदस्त फॉर्ममध्ये आहे आणि गतविजेता देखील आहे. सिंधू सुरुवातीच्या गेममध्ये 4-1 अशी आघाडीवर होती. यंगने यावेळी जास्त मेहनत न करता सिंधूची चूक होण्याची वाट पाहिली. भारतीय खेळाडूच्या चुकांचा फायदा घेत तिने 9-6 अशी आघाडी घेतली. त्यानंतर सिंधूने नेटवर शटल खेळून यंगची आघाडी 11-8 अशी वाढवली.
सिंधूने आपला आक्रमक खेळ सुरू ठेवला आणि त्याचा फायदा तिला मिळाला. तिने पुनरागमन करत स्कोअर 16-17 आणि नंतर 19-20 असा कमी करण्यात यश मिळवले. सिंधूने 22 वर्षीय खेळाडूविरुद्ध आक्रमक भूमिका घेण्याचा प्रयत्न केला पण यंगने आपल्या रैलीचा वेग ( Badminton Rallies) आणि स्मॅशचा शानदार वापर करून 41 मिनिटे चाललेला सामना जिंकला.