BWF Madrid Spain Masters 2024 : दोन वेळची ऑलिम्पिक पदक विजेती पी.व्ही. सिंधूला माद्रिद स्पेन मास्टर्स 2024 बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले. पी.व्ही. सिंधूला शुक्रवारी महिला एकेरीच्या लढतीत थायलंडच्या सुपानिदा कटेथोंग विरुद्ध 26-24, 17-21, 20-22 असा पराभव पत्करावा लागला.
भारतीय बॅडमिंटनपटू आणि थायलंडच्या शटलरमध्ये सुरुवातीपासूनच चुरशीची लढत झाली आणि काही वेळा दोन्ही खेळाडू एकमेकांवर वर्चस्व गाजवत असल्याचे दिसून आले, मात्र सिंधूने पहिला गेम 26-24 असा जिंकला.
दुस-या गेममध्ये पुन्हा एकदा भारतीय खेळाडूचे वर्चस्व दिसून आले जेव्हा भारतीय शटलर्सने मध्य-ब्रेकपूर्वी काही गुणांनी आघाडी घेतली, परंतु कॅथेथाँगने लवकरच पुनरागमन करत 19-17 अशी आघाडी घेतली. त्यानंतर त्यांनी बॅक टू बॅक पॉइंट्स जिंकून दुसरा गेम 21-17 असा जिंकला.
IPL (2008 – 2024) : आयपीएलच्या इतिहासात सर्वात जलद अर्धशतक ठोकणारे Top-10 फलंदाज, पाहा यादी…
त्यानंतर सामना निर्णायक स्थितीत गेला. आत्मविश्वासपूर्ण भारतीय बॅडमिंटनपटूने आपले वर्चस्व कायम राखले आणि 7-3 अशी एकतर्फी आघाडी घेतली, परंतु थायलंडच्या शटलरने पुनरागमन करत सिंधूविरुद्ध 15-13 अशी आघाडी घेतल्याने सामना अधिक रोमांचक झाला. सिंधूने काही गुण मिळवून पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला असला तरी शेवटी सुपानिदाने हा सामना 22-20 असा जिंकला. आणि अशाप्रकारे एक तास 17 मिनिटे चाललेल्या या सामन्यात थायलंडच्या सुपानिदा कटेथोंग हिने विजय मिळवत आगेकूच केली.