Badminton Asia Championships 2024 : भारतीय बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू आणि एचएस प्रणॉय यांना गुरुवारी चीनच्या पीपल्स रिपब्लिक ऑफ निंगबो येथे झालेल्या बॅडमिंटन आशिया चॅम्पियनशिप 2024 मध्ये पराभवाला सामोरे जावे लागले. यासह भारताचे या स्पर्धेतील अभियान संपुष्टात आले.
जागतिक क्रमवारीत 16 स्थानापर्यंत असलेल्या खेळाडूंना ऑलिम्पिकसाठी पात्रता मिळवता येईल. सिंधू सध्या क्रमवारीत 12व्या स्थानी असली तरी 2023पासून तिला एकही स्पर्धा जिंकता आलेली नाही. त्यामुळे सिंधूवरील दडपण वाढत आहे. दोन वेळा ऑलिम्पिक पदक विजेत्या पीव्ही सिंधूने महिला एकेरीच्या सामन्यात चीनच्या शटलरला कडवी झुंज दिली. एक तास 9 मिनिटे चाललेल्या या लढतीत बॅडमिंटनच्या जागतिक क्रमवारीत 12व्या क्रमांकावर असलेल्या पीव्ही सिंधूला चीनच्या पीपल्स रिपब्लिकच्या हॅन यू विरुद्ध 18-21, 21-13, 17-21 असा पराभव स्वीकारावा लागला. हॅन यू ही जागतिक क्रमवारीत सातव्या क्रमांकावर आहे.
याशिवाय महिला दुहेरीच्या लढतीत तनिषा क्रास्टो आणि अश्विनी पोनप्पा या जोडीला जपानच्या नामी मत्सुयामा आणि चिहारू शिदा या जोडीकडून 21-17, 21-12 अशा सरळ गेममध्ये पराभवाला सामोरे जावे लागले.
Asian Wrestling Championships 2024 : भारताचा युवा कुस्तीपटू उदितची रौप्य कामगिरी….
त्याचवेळी पुरुष एकेरीतही एचएस प्रणोयला दुसऱ्या फेरीत पराभव पत्करावा लागला. लक्ष्य सेन, किदाम्बी श्रीकांत पहिल्याच फेरीत बुधवारी पराभूत झाले. त्याशिवाय सात्विक-चिराग या स्पर्धेत सहभागी झालेले नाहीत आणि यासह स्पर्धेतील भारताची मोहीम संपुष्टात आली. 43 मिनिटे चाललेल्या पुरुष एकेरीच्या लढतीत जागतिक क्रमवारीत 9व्या स्थानावर असलेल्या एचएस प्रणोयला चायनीज तैपेईच्या 19व्या मानांकित लीन चीन यू याने 21-18, 21-11 अशी धूळ चारली.