Mamata Banerjee – पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Chief Minister Mamata Banerjee ) जखमी झाल्या आहेत. टीएमसीने आपल्या X हँडलवर ही माहिती दिली आहे. टीएमसीने लिहिले की, “आमच्या अध्यक्षा गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांच्यासाठी प्रार्थना करा.”
Our chairperson @MamataOfficial sustained a major injury.
Please keep her in your prayers 🙏🏻 pic.twitter.com/gqLqWm1HwE— All India Trinamool Congress (@AITCofficial) March 14, 2024
सीएम ममता यांचा एक फोटोही समोर आला आहे, ज्यामध्ये त्यांच्या कपाळातून रक्त येत आहे. त्यांना कोलकाता येथील एसएसकेएम रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, सीएम ममता आपल्या घरात चालताना पडल्याचं समोर आलं आहे. यानंतर अभिषेक बॅनर्जी त्यांना रुग्णालयात घेऊन गेले.
(Chief Minister Mamata Banerjee sustained serious head injury; admitted to hospital)