वाघोली – येथील साईसत्यम परिसरामध्ये वास्तव्यास असणाऱ्या 45 वर्षीय व्यक्तीची खासगी लॅबमध्ये करोना चाचणी केली असता ती पॉझिटिव्ह आली आहे. या व्यक्तीचा शासकीय कोविड सेंटरमध्ये स्वॅब घेण्यात आला असून त्याचा रिपोर्ट अद्याप आला नाही. त्यास ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.
पॉझिटिव्ह 45 वर्षीय व्यक्तीचा भाऊ पॉझिटिव्ह आला होता. यशस्वी उपचारानंतर तो बरा होऊन घरी परतला आहे. साई सत्यम परिसर सील केला आहे. वाघोली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने सर्व्हेक्षण करण्यात येणार आहे. आत्तापर्यंत एकूण 18 रुग्ण सापडले असून यापैकी 13 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत तर 5 रुग्ण ऍक्टिव्ह आहेत.