मुंबई – महाराष्ट्राच्या राजकारणात कोणता नेता कुठल्या पक्षाशी हाथ मिळवणी करून शपथ विधी घेऊल याचा नेम नाही. गेल्यावर्षी एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंड करतमुख्यमंत्री पदाची शपथविधी घेतली तर आता गेल्या काही दिवसांपूर्वी अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. मात्र राजकीय वर्तुळात अशीही चर्चा आहे की,अजित पवार लवकरच मुख्यमंत्री होणार आहे.
अशात आज अजित पवार यांचा शनिवारी २२ जुलै रोजी वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी एक सूचक ट्वीट केलं आहे. सध्या या ट्विटची सर्वत्र चर्चा होत आहे. लवकरच #अजितपर्व’ असं ट्विट करत मिटकरी यांनी एक व्हिडिओही शेअर केला आहे. यावरून आता अजित पवार लवकरच मुख्यमंत्री होणार यावरून राजकारण तापले आहे,
यावर आता भाजप नेते गिरीश महाजन यांनी माध्यमांशी बोलतांना प्रतिक्रिया दिली आहे.ते म्हणाले,’थोडेफार अतिउत्साही कार्यकर्ते असतात. 2024 च्या निवडणुका या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालीच होणार आहेत. भावी मुख्यमंत्र्यांच्या चर्चेला काही तथ्य नाही. पक्षश्रेष्ठींने थेट सांगितलं आहे. सध्या तरी मुख्यमंत्री बदलण्याचा विषय नाही. स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच सांगितलं आहे की, 2024 च्या निवडणुका एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लढवायच्या आहेत”, अशी प्रतिक्रिया गिरीश महाजन यांनी दिली.