अजित पवार हेच उपमुख्यमंत्रिपदाचे मानकरी

बारामतीतीतील पदाधिकारी, कार्यकर्त्यांची भावना

जळोची – सदैव, धडाडीचे निर्णय घेणारे, रोखठोकपणे व्यक्तिमत्त्व म्हणून परिचीत असताना प्रशासनावरही तेवढ्याच ताकदीने अंकुश ठेवणारे अजित पवार हेच राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदी विराजमान व्हावेत, अशी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष व कार्यकर्त्यांनी केली आहे.

राज्यातील काही महत्तवांच्या पदांचे वाटप झाले असताना उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी ही अजित पवार यांच्याकडेच असावी, अशी मागणी कार्यकर्त्यांकडून आजही होत आहे. उपमुख्यमंत्रिपदावर अजित पवार यांच्यासारखीच सक्षम व्यक्ती असावी. मुख्यमंत्र्यांबरोबर पवार हेच सक्षमपणे काम करू शकतात, असा विश्‍वास कार्यकर्त्यांकडून व्यक्त केला जात आहे. महाराष्ट्रातील शेतकरी हा खऱ्या अर्थाने कर्जमुक्त होईल, त्यासाठी त्यांनी केलेली काही कामे महत्त्वाची ठरणार आहेत.

समस्त महाराष्ट्रातील अनेक प्रश्‍न प्रलंबित आहेत ते मार्गी लावण्याचे काम कोण करणार असेल तर ते अजित पवार करू शकतात. त्यामुळे त्यांना उमुख्यमंत्रिपदच योग्य ठरेल, यासंदर्भात पक्षाध्यक्ष शरद पवार यांनाही निवदेन देण्यात येणार आहे.

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे महामंडळ, महात्मा फुले महामंडळ व सर्व मागासवर्गीय महामंडळाचे कर्जमाफ होण्यासाठी अजित पवार यांना पत्र देण्यात आले आहे, असे बल्लाळ यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.