“स्ट्रीट डान्सर 3’मधील आपल्या लुकचे पहिले पोस्टर वरुण धवनने नुकतेच रिलीज केले होते. त्यानंतर लगेचच दुसऱ्याच दिवशी श्रद्धा कपूरनेही “स्ट्रीट डान्सर 3’मधील आपल्या बोल्ड लुकचे पहिले पोस्टर रिलीज केले. श्रद्धाने रेमो डिसोझाच्या “एबीसीडी 2′ मध्ये आपल्या डान्सिंग स्कीलचे दर्शन घडवले होते.
आता “स्ट्रीट डान्सर 3’मध्येही ती पुन्हा एकदा डान्सचा जलवा दाखवण्यास सिद्ध झाली आहे. ब्लॅक शॉर्ट, मेश स्टॉकिंग आणि निओ ग्रीन क्रॉप टॉप घातलेल्या श्रद्धाच्या पोस्टरवर “कीप द फायर बर्निंग…द बॅटल इज 6 मुव्हज अवे !’ अशी कॅप्शन दिली आहे.
“स्ट्रीट डान्सर 3’चा ट्रेलर 18 डिसेंबरला रिलीज होणार आहे, हे देखील या पोस्टरवरून जाहीर केले गेले आहे. रेमो डिसोझाच्या “एबीसीडी’ आणि “एबीसीडी 2′ ला मिळालेल्या मोठ्या यशानंतर आता “स्ट्रीट डान्सर…’च्या पुढच्या भागालाही प्रेक्षकांचा अशाच जोरदार प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा आहे.
“स्ट्रीट डान्सर 3′ पुढच्या वर्षी 24 जानेवारीला रिलीज होणार आहे. मुख्य म्हणजे वरुण धवन आणि श्रद्धा कपूरच्या व्यतिरिक्त यामध्ये प्रभु देवा आणि नोरा फतेही हे लीड रोलमध्ये असणार आहेत.