मुंबई : महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी)अटक केली आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणात त्यांची १२ तासांहून अधिक काळ चौकशी करण्यात आली होती. त्यांना मंगळवारी कोर्टात ११ वाजता हजर करण्यात येणार आहे.
अनिल देशमुखांना अटक केल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ माजली असून यावर अनेक राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. अनिल देशमुख यांचा अटकेनंतर भाजप आमदार नितेश राणे यांनी खोचक टीका करणारं ट्विट केलं आहे.
नितेश राणे यांचे ट्विट
“अनिल देशमुख हॅपी दिवाली आणि अनिल परब मेरी ख्रिसमस?”,
Anil deshmukh.. Happy Diwali!
Anil Parab..Merry Christmas??
Special thanks to nawab malik n Sanjay raut 😅
— nitesh rane (@NiteshNRane) November 1, 2021