मुंबई : राज्यात सध्या खासदार श्रीकांत शिंदे यांचा मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीतील फोटो व्हायरल झाल्यानंतर आता शिंदे गटाकडून खासदार सुप्रिया सुळे यांचा देखील एक वादग्रस्त फोटो शेअर करण्यात आला आहे. शिंदे गटाच्या शितल म्हात्रें यांनी त्याच्या ट्विटर अकाऊंटवरुन खासदार सुप्रिया सुळे यांचा एक फोटो ट्विट केला आहे. या फोटोमध्ये सुप्रिया सुळे यांच्या मागे मुख्यमंत्र्यांचा बोर्ड दिसत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांचा एक फोटो ट्विट करण्यात आला होता. हा फोटो ट्विट करून श्रीकांत शिंदे हे मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत बसल्याचा दावा राष्ट्रवादीने केला होता. यावरून वाद निर्माण झाल्याने श्रीकांत शिंदे यांनी त्याबाबत स्पष्टीकरण देखील दिले होते.
हा फोटो बघा.. कोण कोणाच्या खुर्चीवर बसलयं ?? pic.twitter.com/8UUb5VzMQR
— sheetal mhatre (@sheetalmhatre1) September 23, 2022
दरम्यान, आता शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी खासदार सुप्रिया सुळे यांचा एक फोटो ट्विट केला आहे. फोटो ट्विट करत ‘हा फोटो बघा…कोण कोणाच्या खुर्चीवर बसलयं ? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. आता यावरून राष्ट्रवादी काँग्रेस चांगलेच आक्रमक झाले आहे, हा फोटो बनावट असल्याचा दावा राष्ट्रवादीकडून करण्यात आला आहे. तसेच या प्रकरणावरुन राष्ट्रवादीच्या वतीने शीतल म्हात्रे यांच्याविरोधात तक्रार देखील दाखल करण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे.
तर श्रीकांत शिंदे हे मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत बसल्याचा दावा राष्ट्रवादीने केला होता. यावरून वाद निर्माण झाल्याने श्रीकांत शिंदे यांनी त्याबाबत स्पष्टीकरण देखील दिले होते. हे आपल्या घरातलं कार्यालय आहे, असे स्पष्टीकरण देताना श्रीकांत शिंदे म्हणाले, “हे सगळं हास्यास्पद असल्याचे म्हटले होते.