चंदीगढ – भारतासह जगभरात २०१९ हे वर्ष संपूर्ण सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओंनी गाजवलं. त्यात करुन सर्वाधिक लोकप्रिय ठरल्या त्या पश्चिम बंगालच्या रानू मंडल. राणाघाट रेल्वे स्टेशनवर गाणं गातानाचा त्यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आणि त्या रातोरात स्टार झाल्या. त्यानंतर आता वर्षाच्या अखेरीस असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओतील तरुणाचा आवाज ऐकल्यावर तुम्हीही हैराण व्हाल.
सोशल मीडियावर वायरल व्हिडीओ चंदीगढमधील एका रेल्वे स्टेशनवरील असल्याचं म्हटलं जात आहे. एका फेसबुक पेजवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओमध्ये एक तरुण अक्षय कुमारचं नुकतंच रिलीज झालेलं ‘फिलहाल’ हे अल्बम सॉन्ग गाताना दिसत आहे. सध्या त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर कौतुकाचा विषय ठरत आहे.