गेल्या काही वर्षांपासून टॅटू काढण्याचे फॅड वाढले आहे. तसे पाहिले तर टॅटू हे आजचे फॅशन स्टेटमेंट आहे. कपल टॅटू, लव्हर टॅटू हे सध्या बरेच चर्चेत आहे. बॉलीवूडमध्ये टॅटूचा चांगलाच बोलबाला आहे. टॅटू काढण्याच्या वेडाने सामान्यच नाही तर सेलिब्रिटी देखील पछाडले आहेत. अशातच पुन्हा एकदा बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण आपल्या टॅटूमुळे चर्चेत आली आहे.
View this post on Instagram
#deepikapadukone on the sets of #indianidol today #viralbhayani @viralbhayani
अभिनेता रणबीर कपूर आणि दीपिका पदुकोन यांचे प्रेमप्रकरण हे जेव्हा उच्चकोटीला पोहोचले होते तेव्हा दीपिकाने आपल्या मानेवर आरके नावाचा टॅटू काढला होता. मात्र, ब्रेकअप झाल्यानंतरही हा टॅटू सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. रणवीर सिंगबरोबर लग्नाच्या बेडीत अडकल्यानंतर तिने हा टॅटू काढून टाकला असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर रंगत आहे. दरम्यान, १० जानेवारीला २०२० ला दीपिका ‘छपाक’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.